डोंबिवली ( शंकर जाधव )
डोंबिवलीच्या अष्टविनायक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने साकरलाय अवकाशातील तारांगण,
लाडका बाप्पा ही इथे अवकाशात विराजमान झालाय असा हुबेहूब देखावा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी स्वतःहा साकारलाय, कोरोनच्या महामारी नंतर आलेल्या आर्थिकमंदी नंतर सर्वसामान्य कुटुंब राहत असलेल्या उमेश नगर वस्तीत येथीलअष्टविनायक मंडळाने कमी खर्चात भव्य देखावा उभारलाय
शुभकार्याच्या शुभ प्रसंगी नमन तुला ईश्वरा भक्तिभावाने गणरायाची आराधना करून 36 वर्ष उत्सव साजरा करीत असताना सामाजिक बांधिलकी जतन करून देखावा व जनतेमध्ये पर्यावरण, पोलीस मित्र, प्लास्टिक निर्बंध ,स्त्रिभ्रुन् ह्त्या असे अनेक प्रसंग देखाव्यातून मंडळाने साकारले आहेत.अनेक वेळा प्रथम क्रमांक ही पटकावला आहे. मंडळाचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक प्रकाश भोईर, माजी नगरसेविका सरोज प्रकाश भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाने यंदाचा देखावा उभारलाय. येथील परिस्तिथीचा आढावा घेतलाय् आमचे प्रतिनिधी शंकर जाधव यांनी…