पोलिसांनी शोधल्याने पालकांनी मानले आभार
डोंबिवली ( शंकर जाधव )
लहानपणी आई- वडील ओरडले की पाल्य गुपचूप बसत होती.मात्र आता पाल्यांना आई- वडिलांनी जरा ओरडल की मुले रागावतात.मग मुले रागावून घर सोडून बाहेर पडतात.अशीच घटना डोंबिवलीत बुधवारी घडली.आई रागवल्याने 12 वर्षाच्या मुलाने थेट ठाकुर्ली स्टेशन गाठले. पोलिसांनी अवघ्या काही तासात मुलाचा शोध घेऊन त्याला आई-वडिलांच्या स्वाधीन केले.आपल्या मुलाला पाहून आई- वडिलांनी पोलिसांचे आभार मानले.
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी सहा वाजता नेहमी प्रमाणे 12 वर्षीय मुलाने क्लासला जातोय असे सांगून घरातून निघाला.नेहमी सकाळी 10 वाजता घरी मुलगा परत न आल्याने त्याच्या आई- वडिलांनी चौकशी करण्यास सुरुवात केली.मात्र मुलगा क्लासला आलाच नाही असे समजल्यावर आई-वडिलांची चिंता वाढली.त्यांनी टिळकनगर पोलीस ठाण्यात आपला मुलगा सकाळी घरातून गेला तो अजून आलाच नाही असे पोलिसांना सांगितले.
पोलिसांनी आई-वडिलांकडे मुलाचा फोटो मागवून घेतला.पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत दुकानाबाहेरील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले.तो मुलगा घरातून बाहेर पडल्यानंतर 90 फिट रोडवरून चालत चालत ठाकुर्ली रेल्वे स्थानकापर्यत पायी चालत असल्याचे सीसीटीव्ही कॅमेरात दिसले.दुपारी अडीच वाजता पोलिसांनी ठाकुर्ली स्थानकात धाव घेतली.पोलीस स्थानकात पोहचताच त्यांना तो मुलगा एका बाकड्यावर बसलेला दिसला.पोलिसांनी मुलाच्या जवळ जाऊन त्याची चौकशी केली.मुलाला प्रेमाने जवळ करत त्याला टिळकनगर पोलीस ठाण्यात आणले.घरी का परत गेला नाही असे पोलिसांनी मुलाला विचारल्यावर त्याने जे कारण सांगितले ते ऐकून पोलिसांना आश्चर्य वाटले.आई ओरडली म्हणून मला राग आला नाही की घरी न जाता स्टेशनला गेलो असे मुलाने पोलिसांनी सांगितले.
काही वेळाने पोलिसांनी मुलाच्या आई- वडिलांना तुमचा मुलगा सापडला असून टिळकनगर पोलीस ठाण्यात मुलाला आणल्याचे सांगितले.आई-वडील धावतधावत पोलीस ठाण्यात आले असता समोर मुलाला पाहताच डोळ्यातून आनंदाश्रू आले.मुलगा घट्ट मिठी मारत ‘बाळा आमचं अस काय चुकलं रे, पुन्हा तुझ्यावर रागावणार नाही, घर सोडून जाण्याचा विचार पण करू नकोस ‘ असे म्हणाली.आपल्या मुलाचा शोध घेऊन सुखरूपपणे त्याला आपल्या स्वाधीन केल्याबद्दल टिळकनगर पोलिसांचे आई-वडिलांनी आभार मानले.
दरम्यान , टिळकनगर पोलीस ठाण्याचे वपोनी आफाळे , पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अथक मेहनत घेऊन मुलाचा शोध घेतल्याबद्दल नागरिकांकडून त्यांच्या कामाचे कौतुक होत आहे.तर पोलिसांच्या या कामाची दखल घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांकडूनही शाबासकी मिळत आहे.