डोंबिवली ( शंकर जाधव ) डोंबिवली पूर्वेकडील एमआयडीसी निवासी विभागात रस्ते ठेकेदाराकडूनरस्त्यांची काम चालू असताना खोदकामाच्या वेळी महानगर गॅस पाईपलाईन प्लॉट नंबर RH ३६. एकदंत सोसायटी समोर निष्काळजीपणे तुटल्याचा आरोप स्थानिकांनी केला.

बुधवारी दुपारी साडेचार च्या सुमारास रस्त्यांची काम चालू असताना खोदकामाच्या वेळी महानगर गॅस पाईपलाईन प्लॉट नंबर RH ३६ एकदंत सोसायटी समोर निष्काळजीपणे तुटलीत्यामुळे त्या विभागातील सर्व सोसायट्यांचा गॅस पाईपलाईन पुरवठा बंद करण्यात आला. सदर घटनास्थळ मनसे विभाग अध्यक्ष संजय चव्हाण व उपविभाग अध्यक्ष सचिन माने यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.या घटनेबाबत ठेकेदाराला बोलवून त्याला त्याबद्दल जाब विचारला. ठेकेदाराने भविष्यात अशाप्रकारे कोणततीही घटना घडणार नाही याची ग्वाही दिली. याप्रसंगी जर कोणती दुर्घटना घडली असती तर नागरिकांच्या जीवाला धोका झाला असता असे चव्हाण यांनी सांगितले.