कल्याण ( शंकर जाधव )
बिहार येथे राहणारी संजुदेवी राजवंशी ही महिला आपल्या अडीच वर्षाच्या चीमुकल्यासह चार दिवसांपूर्वी कल्यानमध्ये आली होती .मोलमुजरी करत उदरनिर्वाह करण्यासाठी तिने बिहारहून कल्याण गाठलं होतं .गेली चार दिवस ती कामाच्या शोधात होती रात्री झोपण्यासाठी ती कल्याण स्टेशनचा आसरा घेत होती .काल रात्री नेहमीप्रमाणे ती आपल्या चिमुकल्या सह कल्याण रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक दोनच्या आडोशाला झोपली होती .मुलाला झोप लागल्यानंतर पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ती वडापाव घेण्यासाठी मुलाला तिथेच ठेवून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर गेली. वडापाव घेवून परत येऊन बघितलं असता तिचा मुलगा तिला दिसला नाही .आजूबाजूला बऱ्याच वेळ तिने शोधा शोध केली विचारपूस केली मात्र मुलगा न सापडल्याने संजू देवी यांनी कल्याण रेल्वे पोलीस ठाणे गाठले. मुलगा हरवल्या बाबतची तक्रार नोंदवली .रेल्वे पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखत मुलाच्या शोधासाठी पथके नेमले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी अर्चना दुसाने ,पोलिस अधिकारी प्रमोद देशमुख यांच्या पथकाने शोध सुरू केला .रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही तपासले असता या सीसीटीव्ही मध्ये एक तरुण व एक महिला त्या मुलाला घेऊन जाताना दिसून आलं . पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवली आजूबाजूच्या परिसरात सुद्धा शोध सुरू केला. अवघ्या काही तासात सीसीटिव्ही मध्ये दिसणारा हा तरुण व ही महिला उल्हासनगर येथील खेमानी झोपडपट्टीमध्ये राहत असल्याची माहिती मिळाली पोलिसांनी तात्काळ त्या ठिकाणी धाव घेत या दोघांनाही अटक केली. या बाळाला सुखरूप ताब्यात घेतलं .अवघ्या सात तासात
पोलिसांनी या अडीच वर्षाच्या चिमुकल्याची माऊलिशी भेट घडवून आणली .महिलेने पोलिसांचे आभार मानले .