( शंकर जाधव )
गणपती विसर्जन बंदोबस्तासाठी डोंबिवली सहायक पोलीस आयुक्त सुनील कुराडे, विष्णुनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ भालेराव , पोलीस निरीक्षक मोहन खंदारे यांच्या सहकार्याने आणि ईगल ब्रिगेड फाउंडेशनच्या सदस्यांनी गणपती विसर्जन घाटावरती क्राउड मॅनेजमेंट तसेच ट्रॅफिक मॅनेजमेंट साठी पोलिसांना सहकार्य केले. आजु बाजूला घडणाऱ्या गोष्टींवर लक्ष ठेवण्यास फाऊंडेशनचे सहकार्य मिळाले. अशाप्रकारे ईगल ब्रिगेड फाउंडेशननी दीड दिवस आणि पाच दिवसाच्या गणपती विसर्जनामध्ये सहभाग घेतला. तसेच सहा दिवस सात दिवस आणि दहा दिवस या दिवशीही मोठ्या प्रमाणावर सामील झाले. तसेच निर्मल फाऊंडेशन चे सुद्धा सहकार्य बंदोबस्तात लाभले.गणपती विसर्जन बंदोबस्तासाठी ईगल ब्रिगेड फाउंडेशनचे संस्थापक विश्वनाथ बिवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली संजय गायकवाड, स्वप्निल महाजन, ओजस ठोंबरे, योगेश साबळे, अनुप इनामदार, अभिजीत कदम, मोहन पवार शंतनू सावंत, सुहास परब, मंदार लेले, चिराग ठक्कर, सतीश सोनी, समीर कांबळे, केतन राणे,अक्षय नारखडे,अशोक हेगिस्ते, नितीश चांदसरकर आदी उपस्थित होते.
