नाटक म्हणजे मराठी भाषिक प्रेक्षकांचा जीव की प्राण समजला जातो. कल्याणमध्ये याचा प्रत्यय तर वेळोवेळी नाट्य सादरकर्त्यांना येतो. याच पार्श्वभूमीवर चार मित्र कल्याण आणि स्वामी नाट्यंगण खास प्रेक्षकांच्या आग्रहाखातर ‘नवरा आला वेशीपाशी‘ या नाट्यप्रयोगाचे सादरीकरण आज शनिवारी २८ जानेवारी, संध्याकाळी ८.३० ला करणार आहेत. तसेच उद्या रविवारी २९ जानेवारी रोजी संध्याकाळी ७.३० दादर येथील रवींद्र नाट्यमंदिर मिनी येथे प्रयोग सादर करण्यात येणार आहे. सदर नाटकाचे लिखाण व दिग्दर्शन यश नवले आणि राजरत्न भोजने यांनी संयुक्तपणे केले आहे. धृव- रित्वी क्रिएशन्स निर्मित या प्रयोगाला अनेक लहान-मोठ्या संस्थांचा हातभार भविष्यात लागण्याची शक्यता आहे.

नवरा आला वेशीपाशी
लेखक/दिग्दर्शक – यश नवले,राजरत्न भोजनेसंगीत – ओमकार सोनावणे, निनाद म्हैसाळकर
नेपथ्य – अमेय भालेराव
प्रकाशयोजना – राजेश शिंदे
रंगमंच व्यवस्था – चैतन्य लोके
निर्माता – संकेत सुधाकर पाटील,अनिकेत राजेंद्र कदम
विशेष आभार
हृषिकेश गिरीष कुलकर्णी
प्रितेश म्हामुणकर
फ्रेमफायर स्टुडिओ
स्टोरिया प्रोडक्शन
आणि अनुभूती