
डोंबिवली ( शंकर जाधव ) ‘गणपती बाप्पा मोरया’ म्हणत आपल्या गावाला निघालेल्या कोकणवासीयांना लालपरीतून नेताना एसटी चालक-वाहकांनी चक्क डान्स केला.डोंबिवली पश्चिमेकडील देवीचा पाडा येथील गावदेवी मंदिरासमोरील मैदानात शिंदे समर्थक संदेश पाटील खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्यावतीने गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी मोफत एसटी सेवा दिली.यावेंळी एसटी चालक-वाहकांना आपला आनंद नृत्यातून व्यक्त केला.
गावदेवी मंदिराच्या मैदानात 44 एसटी सेवा देण्यात आल्याचे शिंदे समर्थक संदेश पाटील यांनी सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नाने कोकणवासीयांना मोफत एसटी सेवा दिल्याने कोकणवासीयांनी आभार मानले.तर एसटी चालक- वाहकांनी मुख्यमंत्री शिंदे यांचे आभार मनात शिंदे सरकारमुळे आमचे ‘ अच्छे दिन’ आल्याचे सांगितले.
मैदानात कोकनवासीय आपल्या कुटुबिंयांना घेऊन एसटीत प्रवास करण्यासाठी आनंदी झाले होते.यावेळी खासदार डॉ.शिंदे यांनी एसटीला झेंडा दाखवला. कोकणवासीयांनी खासदार डॉ.शिंदे यांचे आभार मानले.तर खासदार डॉ.शिंदे यांनी कोकणवासीयांना प्रवास सुखाचा जावो असे सांगत शिंदे सरकार कोकणवासीयांसाठी जोरदार प्रयत्न करत असल्याचेही सांगितले.