डोंबिवली ( शंकर जाधव ) घर घर तिरंगा
अंतर्गत कल्याणात उपप्रादेशिक परिवहन विभाग ( कल्याण ) आणि मोटर ड्राइविंग स्कूल संघटना यांच्या विद्यमाने कार रॅली काढण्यात आली. कार् रॅलीला मार्गदर्शन करण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन विभाग प्रभारी अधिकारी विनोद साळवी व सहाय्यक अधिकारी रमेश कलुलकर, ड्रायव्हिंग स्कूल संघटनेचे अध्यक्ष सुभाष पेंडकर देवराम बांडे, शेखर जोशी,आरटीओ प्रतिनिधी वैभव हरदास, इतर संचालक व तसेच कर्मचारी उपस्थित होते. कल्याण उपप्रादेशिक परिवहन विभाग कार्यालयापासून रॅलीला सुरुवात करण्यात आली. दुर्गाडी चौक मार्गातून कार्यालयात रॅलीची सांगता करण्यात आली.स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी निमित देशातील प्रत्येक नागरिकांनी घरावर तिरंगा लावावा अशी विनंती रॅली करण्यात आली.
