डोंबिवली ( शंकर जाधव )
आपला भारत देश यावर्षी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. देशाने स्वातंत्र्य मिळवून आज ७५ वर्ष झाली. या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकार होत असलेल्या हर घर तिरंगा अभियान अंतर्गत, कॅबिनेट मंत्री नामदार रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली डोंबिवली पश्चिम मंडळाच्या वतीने तिरंगा रॅली काढण्यात आली. या रॅलीत डोंबिवलीतील तब्बल ४६ शाळेतील १५०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. रॅलीत भारतीय जनता पक्षाचे सर्व माजीनगरसेवक, माजी नगरसेविका सर्व आघाडीचे अध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक सहभागी झाले होते.