कल्याण (शंकर जाधव)
विधानसभा अध्यक्षांविरोधात अपशब्द वापरल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष तथा आमदार जयंत पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. नागपूरमधील हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत जयंत पाटील यांचे निलंबन करण्यात आले आहे. याच्या विरोधात कल्याण मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कल्याण पश्चिमेतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात राष्ट्रवादीच्या वतीने निदर्शने करण्यात आली.
नागपूर येथील अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाषणाच्या ओघात चुकुन काही शब्द वापरले. त्याचा विपर्यास करून त्यांचे अधिवेशन कालावधीसाठी निलंबन केलं आहे त्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निषेध करत असून त्यांचं निलंबन मागे घेण्याची मागणी आम्ही करत असल्याची प्रतिक्रिया यावेळी जिल्हाध्यक्ष शिंदे यांनी दिली.