डोंबिवली ( शंकर जाधव ) डोंबिवली पूर्वेकडील नेहरू मैदान येथून रिजेनसी अनंतम येथे जाण्यासाठी खाजगी बस प्रवाश्यांना घेऊन जात असताना चालक साईनाथ वडणे याने वाहतुकीचे नियम मोडत बस फुटपाथवर चढवली. या रस्तावर एक रेशनिंग गाडी बंद पडली होती. खाजगी बस चालकाने याचा विचार न करता प्रवाश्यांचा जीव धोक्यात टाकत फुटपाथवर चढवलेली बस गटाराच्या झाकणावरून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र झाकणात बसचे चाक रुतल्याने बस अडकली. जागरूक नागरिक शेट्टी यांनी हा प्रकार आपल्या मोबाईल मध्ये कैद केले. शेट्टी यांनी वाहतूक पोलिसांनी घटनेची माहिती दिली. फुटपाथवरील बस बाहेर काढण्यासाठी जेसीबी मागविण्यात आली आहे. तोपर्यत वाहतूक कोंडी झाल्याने वाहनचालक संतापले होते.