डोंबिवली ( शंकर जाधव ) डोंबिवली पश्चिमेलकडील रेल्वे मैदान जवळ mh04 gf 4849 या चालू गाडीला अचानक आग लागल्याची घटना रविवारी रात्री साड़े नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. यावेळी मनसे महिला शाखा अध्यक्ष गौरी कुडतरकर व महाराष्ट्र नवनिर्माण सेना उपशहर अध्यक्ष प्रेम पाटील यांनी अग्निशामक दलाला सदर घटनेची माहिती दिली अग्निशामक दलाच्या जवानांनी काही वेळातच गाडीला लागलेली आग आटोक्यात आणली.तसेच काँग्रेस युवक कॉंग्रेसचे पदाधिकारी पमेश म्हात्रे यांनी सदर घटना आपली मोबाईल मध्ये कैद करून आमच्या प्रतिनिधीला माहिती व व्हिडिओ दिले.