डोंबिवलीत इंजिनिअर्स डे” दिवशी राज्यस्तरीय उद्योजक परिषद
डोंबिवली ( शंकर जाधव ) शिंदे – फडणवीस सरकार स्थापन होऊन दोन महिन्याचा कालावधी उलटल्यानंतर राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत हे डोंबिवलीत बुधवारी इंजिनिअर्स डे” दिवशी राज्यस्तरीय उद्योजक परिषदेसाठी येणार आहेत.थोर इंजिनिअर भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरप्या यांची जयंती म्हणजेच “इंजिनिअर्स डे” दिवशी सावित्रीबाई फुले नाट्यगृहात सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टच्या वतीने परिषद भरवली जाणार आहे.
यासंदर्भात ट्रस्टचे पदाधिकारी राकेश चौधरी, संतोष पाटील, विनीत बनसोडे, सुमित पाटील, नितीन बोरसे यांनी डोंबिवली जिमखाना येथील पत्रकार परिषदेत माहिती दिली.नोकरी मागणारे नाही तर नोकरी देणारे उद्योजक बना हा उद्देश समोर ठेवून मराठी उदोजकांना मार्गदर्शन केले जात असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. राज्यस्तरीय उदयोजक परिषदेला कल्याण-डोंबिवली तसेच आसनगाव- शहापूर, अंबरनाथ बदलापूर या परिसरातील विविध उद्योजक, फॅक्टरी ओनर्स, विविध असोसिएशन यामध्ये सहभागी होणार आहेत. या परिषदेचे उद्घाटन उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. परिषदेला उद्योग समूहाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक हणमंतराव गायकवाड, MIDC चे सीईओ डॉ. पी. अनबलगन (भाप्रसे), MSME महाराष्ट्र राज्याचे संचालक पार्लेवार, महाराष्ट्र राज्य इनोवेटिव्ह सोसायटीचे सीईओ डॉ. नामदेवराव भोसले यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. इंजिनीयर डे अनुषंगाने एका उद्योजकीय प्रदर्शनाचही आयोजन करण्यात आल आहे.