डोंबिवली ( शंकर जाधव )राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल ‘बाळासाहेबांची शिवसेना’ चे आमदार अब्दुल सतार यांनी अपशब्द बोलल्याने राज्यभर त्यांच्याविरोधात आंदोलन सुरू झाली.डोंबिवली पश्चिमेला स्टेशनबाहेरील परिसरात राष्ट्रवादिकडून निषेध आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात डोंबिवली विधानसभा कार्याध्यक्ष नंदू धुळे ( मालवणकर ), कल्याण डोंबिवली जिल्हा सरचिटणी समीर गुधाटे, डोंबिवली विधानसभा संघटक सचिव संजय पाटील, उपाध्यक्ष सुखदेव पडळकर, संघटक सचिव मंगेश जाधव, सोशल मीडिया जिल्हाअध्यक्ष निरंजन भोसले, राजेंद्र नांदोस्कर , संतोष म्हात्रे, उदय शेट्टी, सचिन धुरी यांसह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.आमदार सतार यांच्यावर विष्णूनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करणार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी यावेळी सांगितले.