डोंबिवली (शंकर जाधव)
जानेवारी दरपर्णकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती म्हणजेच पत्रकार दिनाचे औचित्य साधून जनजागृती सेवा समिती महाराष्ट्र संस्थेच्या माध्यमातून समाजजागृती करण्याचं कार्य करणाऱ्या पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. हा सोहळा कडोंमपा डोंबिवली विभागीय कार्यालयातील पत्रकार कक्षात संपन्न झाला. जनजागृती सेवा समिती महाराष्ट्र संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर, जनजागृतीचे सल्लागार आत्माराम नाटेकर, खजिनदार दत्ता कडुलकर यांच्यासह डोंबिवलीतील पत्रकार उपस्थित होते.
विश्व मराठी संमेलनात डोंबिवलीच्या ऐश्वर्या पुणेकर यांच्या पाककृतीस प्रथम पारितोषिक
संस्थेतर्फे उपस्थित पत्रकारांना सन्मानपत्र देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. दरम्यान सध्याची राजकीय परिस्थिती आणि पत्रकारांचे या विषयीचे अवलोकन यावर विस्तृत चर्चा झाली. समाजाची नाळ पत्रकारांना ओळखता येते हे आजच्या पत्रकारितेत कितपत साध्य होते यावर साधकबाधक चर्चा झाली. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात टीव्ही मीडिया, डिजिटल मीडिया, प्रिंट मीडिया बरोबर ब्रेकिंग न्यूज आदी पत्रकारितेतील विविध अंगांमुळे विश्वासार्हतेवर जनता बोटे मोडत असल्याचे दिसून येत आहे काय असा विषय समोर आला. पूर्वी पेपर हातात आला की वाचक प्रथम संपादकीय वाचत असत आता तेही फार दिसून येत नाही. तरीपण आजही गावपातळीवरीलपत्रकार शोध पत्रकारिता करून खरी वास्तुस्थिती जनतेसमोर ठेवत आहे ही बाब पत्रकार दिन म्हणून उल्लेखनीय आहे असे काही पत्रकारांनी सांगितले.
उर्फी जावेदवरून सुरु झालेले प्रकरण आता महाराष्ट्राच्या राजकारणात… दोन महिला नेत्या आमने सामने
दरम्यान पत्रकार दिन निमित्ताने दरपर्णकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस वंदन व पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी डोंबिवली पत्रकार संघाचे उपाध्यक्ष शंकर जाधव,पत्रकार शर्मिला वाळुंज, प्रशांत जोशी, प्रवीण गोरे, प्रशांत माने, शरद शहाणे, अंकिता केळकर, रोशनी खोत आदी पत्रकारांचा सन्मान करण्यात आला.