32 C
Mumbai
Tuesday, May 9, 2023
HomeKalyan-Dombivliफुटपाथवरील उघड्या गटारात मुलगी पडता पडता वाचली

फुटपाथवरील उघड्या गटारात मुलगी पडता पडता वाचली

डोंबिवली ( शंकर जाधव ) स्टेशन परिसरातील फुटपाथवर दुकानदारांनी अतिक्रमण केले असता आता फुटपाथवरील गटारावरील झाकणे तुटलेल्या अवस्थेत दिसतात.डोंबिवली पूर्वेकडील गोग्रासवाडी परिसरात फुटपाथवरून चालताना उघड्या गटारात एक मुलगी पडता पडता वाचली.तिच्या आईने व इतर नागरिकांनी धाव घेत प्रशासनाच्या दुर्लक्षितपणावर संताप व्यक्त केला.
डोंबिवली पूर्वेकडील गोग्रासवाडी येथील
श्रीराम स्टोअर्स च्या बाजूला श्री साई समर्थ कास्य थाळी सेंटरजवळील फुटपाथवरून एक महिला मुलीसह चालत होती.मात्र या फुटपाथवरील गटाराचे झाकण तुटलेल्या अवस्थेत असल्याने मुलगीचा पाय गटारात पडला.मात्र तिच्या आईने मुलीचा हात धरल्याने ती गटारात पडता पडता वाचली.हा प्रकार पाहून नागरिक सदर ठिकाणी धावत आले. इतके दिवस या फुटपाथच्या गटारावरील झाकण तुटलेल्या अवस्थेत असताना दुकानदारांनी आणि नागरिकांनी पालिका प्रशासनाला कळविणे आवश्यक होते.मात्र तसे कोणीही केले नसल्याने फुटपाथवरून चालताना नागरिक गटारात पडल्याची शक्यता होती.दरम्यान या घटनेनंतर पालिका प्रशासनाने या फुटपाथवरील गतरावर नवीन झाकण लावले.काही दिवसांपूर्वी डोंबिवली पूर्वेकडील 90 फिट रोडवर फुटपाथच्या गटारावरील झाकण नसल्याने एक ज्येष्ठ व्यक्ती पडून त्यांच्या पायाला 17 टाके लागले होते.या घटनेनंतर या ठिकाणी झाकण लावल्यात आले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

Translate »