डोंबिवली ( शंकर जाधव ) डोंबिवली पूर्वेकडील पाथर्ली गाव ८ नंबर नाका मंजुनाथ शाळेजवळ सोमवारी सकाळी साडे आकरा वाजण्याच्या सुमारास बुलेटला अचानक आग लागली.भररस्त्यात घडलेल्या घटनेने वाहलचालकांनी काही वेळ आपली वाहने थांबविली होती.परिसरातील नागरिकांनी पाणी टाकून आग विझवली.पेट्रोल भरून आल्यावर वाहन चालवित असताना अचानक आग लागल्याने दुचाकीस्वाराने बुलेट सोडून रस्त्याच्या कडेला गेला.अग्निशामक दलाचा याची माहिती मिळताच अग्निशामक दलाचा एक बंब घटनास्थळी दाखल झाले होते.