डोंबिवली ( शंकर जाधव )
काँग्रेसच्या भारत जोडो आंदोलनात देशाचे तुकडे करणारी लोक सहभागी झाल्याचा आरोप केंद्रीय माहिती व खेळ मंत्री अनुराग ठाकूर यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर केली. कल्याण – डोंबिवली आढावा दौऱ्यादरम्यान पत्रकार परिषदेत मंत्री ठाकूर बोलत होते.
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर पुढे म्हणाले, हेच लोक जेएनयु युनिव्हर्सिटी मध्ये देशाचे तुकडे करणार असल्याचे पोस्टर देखील लावत होते. विकास कामाचा धडाका लावून मोदींनी आधीच भारत जोडला आहे. आता राहुल गांधी अजून कोणता भारत जोडणार असा टोला केंद्रीय माहिती प्रसारण आणि खेळ मंत्री अनुराग ठाकूर यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना डोंबिवलीत झालेल्या पत्रकार परिषदेत लगावला.
अगामी लोकसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या 303 पेक्षाही अधिक खासदार निवडून येऊन पुन्हा नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान बनतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. कल्याण ग्रामीण भागात भाजपचा खासदार निवडून येण्यासाठी भाजपने प्रयत्न सुरू केले आहेत. त्यादृष्टीने इथल्या समस्या जाणून घेण्यासाठी तीन दिवसांचा दौरा करत असल्याचे सांगतानाच जीएसटीचे पूर्ण पैसे नागरिकांना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. भारत सध्या अर्थव्यवस्थेत पाचव्या क्रमांकावर आहे. गेल्या 60 वर्षात जे काँग्रेसने केले नाही ते आठ वर्षात आम्ही केले. महागाईवर मोदींनी खूप काम केले असून रोजगार वाचवले असल्याचे त्यांनी संगितले. सध्या खेळाच्या बाबतीत सुद्धा देश पुढे जात असल्याचे त्यांनी सांगितले. तेल आणि पिठाचे भाव वाढले असल्याचे विचारताच काँग्रेसच्या सरकारमध्ये याहून दुप्पट महागाई असल्याचा टोला त्यांनी लगावला. तसेच तेलाचे भाव केंर सरकारने कमी केले. ज्या राज्यात भाजप ची सत्ता आहे त्यांनी देखील तेलाचे राजयचे भाव कमी केले. मात्र जिथे काँग्रेसची सत्ता आहे त्या राज्यात भाव कमी झाले नसल्याचे त्यांनी सांगितले.