डोंबिवली ( शंकर जाधव ) डोंबिवलीतून उंबार्डे डंपिंग ग्राउंडच्या दिशने जात असताना पूर्वेकडील सुयोग मंगल कार्यालयासमोरील रस्त्यामधील गटारावरील लोखंडी पत्रा खचून कचरा वाहूगाडीचे चाक अडकल्याची घटना गुरुवारीस सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली.काही दिवसांपूर्वी पूर्वेकडील स्टेशनबाहेरील रस्त्यावर ट्रकचे चाक अश्या प्रकारे अडकल्याची घटना घडली होती.
पालिकेचे कचरावाहू गाडी mh05 n- 0085 क्रमांक डोंबिवली पूर्वेकडील सावरकर रोड आणि भाजी मार्केट येथील कचरा भरून उंबार्डे डंपिंग ग्राउंडच्या दिशने जात होता. सर्वश सभागृहासमोरील रस्त्याच्यासमोर गटारावरील लोखंडी पत्रा खचून कचरा वाहूगाडीचे मागचे चाक अडकले. वाहनचालक गोकुळ आहिरे यांनी या घटनेची माहिती पालिकेच्या घनकचरा व्य्वस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. याची माहिती मिळताच कर्मचारी घटनास्थळी आले.जेसीबीच्या सहाय्याने अडकलेली गाडी बाहेर काढण्यात आली. दरम्यान या ठिकाणची वाहतूक काही वेळ थांबविण्यात आली होती.