डोंबिवली ( शंकर जाधव )
शालेय विद्यार्थ्यांना आपला इतिहास माहिती व्हावा या करिता वक्रतुंड मंडळाने भारत देशावर आतापर्यंत ज्या साम्राज्य् ने राज्य गाजविले त्याचे झेंडे निशानीचा देखावा सादर केला आहे. या देखाव्यातून 44 ध्वजाची माहिती देण्यात आली आहे.
भारत हा अतिप्राचीन आणि वैभवसंपन्न असा देश आहे. वैभवसंपन्न असा देश असल्याने याठिकाणी सतत आक्रमण होत राहिली. या आधुनिक भारताची सात वेळा फाळणी झाली. त्यामुळे दुदैवाने सात वेगळ्य़ा नावाची राष्ट्र आणि ध्वज तयार झाले आहेत. चोल साम्राज्य, मौर्य, गुप्त, कोलिंग साम्राज्य अशा कुशल प्रशासकांनी भारतावर राज्य केले. त्या प्रत्येकाचं निशाण किंवा ध्वज वेगवेगळं होते. भारतावर राज्य करणारे विविध प्रशासक आणि त्यांची निशाणी असलेल्या ध्वजाची माहिती देणारा एक आगळावेगळा देखावा संगीतावाडीतील वक्रतुंड गणेश मित्र मंडळाने सादर केला आहे.
शालेय विद्याथ्र्याना आपला इतिहास माहिती व्हावा या उद्देशाने त्यांनी हा देखावा सादर केला आहे. या देखाव्यातून 44 ध्वजाची माहिती देण्यात आली आहे. तसेच 1904 ला भारताचा पहिला ध्वज अस्तित्वात आला. त्यानंतर आता अस्तित्वात असलेल्या ध्वजाचा प्रवास ही नवीन पिढीर्पयत पोहोचविण्याचा प्रयत्न या देखाव्यातून केला आहे असे मंडळांचे सदस्य आदित्य साठे यांनी सांगितले.
वक्रतुंड मित्र मंडळ हे गणेशोत्सवातून सामाजिक जनजागृती घडविण्यासोबतच सामाजिक बांधिलकी ही जपत आहे. त्यांनी कोरोना काळ असो किंवा कोल्हापूर येथे आलेल्या महापूर. नागरिकांना मंडळाने कायम मदतीचा एक हात दिला आहे. गणेशाची लहान मूर्ती आणि पर्यावरणपूरक सजावट यामुळे या वक्रतुंड गणेश मित्र मंडळांची कायमच परिसरात चर्चा असते. आणि आता त्यांनी साकारलेली सजावट यामुळे मंडळाचे सर्वत्र कौतुक डोंबिवलीत होत आहे.