डोंबिवली ( शंकर जाधव )
आपला वाढदिवस गरिबांना मदत करणारा असावा असा उद्देश समोर ठेवून ग्लोबल सनशाइन ट्रेडिंग सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड डायरेक्टर सुरज माटे यांनी या वाढदिवसानिमित्त अनाथ आश्रम (जीवन संवर्धन फाउंडेशन, टिटवाळा) व वृद्धाश्रम (गार्गी वृद्धाश्रम, कोपर) यांना अन्नधान्य वाटप केले. यावेळी मीनल मोटे, नूतन सूर्यवंशी, सौजन्य मोटे आदी उपस्थित होते. वृद्धाश्रमात वृद्धांशी गप्पा मारत असताना आपल्यात सहभागी होऊन वाढदिवस साजरे करणारे कमी असतात. आमचा आशीर्वाद नेहमी त्यांच्या पाठीशी असून त्यांची प्रगती होऊ दे अशी प्रार्थना वृद्धांनी केली. तर अनाथ आश्रमात अन्नधान करताना त्याच्याशी बोलताना खूप आनंद झाल्याचे मीनल मोटे यांनी सांगितले.