डोंबिवली ( शंकर जाधव ) सहकार भारतीचे संस्थापक सदस्य सहकार महर्षि ,सहकार रत्न अश्या अनेक सन्मानने गौरविलेले सहकारतील गाढ़े अभ्यासक मार्गदर्शक सतीश मराठे ह्यांची भारतीय रिज़र्व बँकेच्या सेंट्रल बोर्ड संचालक म्हणून पुढील ४ वर्षा करता परत निवड झाली आहे. मराठे ह्यांनी मागील टर्म मधे संचालक म्हणून सहकर क्षेत्राच्या समस्या सोडविण्यासाठी अथक प्रयत्न केले. बँक इन्शुरन्स लाखावरुन ५ लाख करुन घेण्यात मराठे ह्यांचा मोलाचा वाटा आहे.सहकार क्षेत्रा साठी केंद्रात स्वतंत्र मंत्रालय होण्यासाठी मराठे ह्यांच्या नेतृत्वात सहकार भारतीने २०१७ पासून प्रयत्न केले होते. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून आज केंद्रात स्वतंत्र सहकार मंत्रालय स्थापन होऊन त्याला महत्वाचा दर्जा देखील प्राप्त झाला आहे. मराठे ह्याचे सहकार क्षेत्रासाठी भरिव योगदान आहे अशी माहिती सहकार भारती कोकण विभाग प्रमुख शैलेश दरगुडे यांनी दिली.पूर्वी मराठे यांनी डोंबिवली नागरि सहकारी बँकेत संचालक मंडळावर असताना बँकेच्या उत्कर्षासाठी परिश्रम घेतले होते.
