डोंबिवली ( शंकर जाधव ) श्रीच्या आगमनाची भक्तगण आतुरतेने वाट बघताना बाप्पाला घरी आणताना खड्ड्याचे विघ्न दूर करा अशी प्रार्थना करत आहेत.पालिका प्राशासन स्वच्छता मोहिमेवर असल्याने संतप्त झालेल्या रिक्षाचालक आले. ‘स्वच्छता मोहिम राबवताय ..आधी रस्त्यातील खड्डे कधी बुजवणार’ असा जाब मोहीम सुरू असताना घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त अतुल पाटील यांना रिक्षाचालकांनी विचारला.
श्री गणेशाचे आगमन होण्यास दोन – तीन दिवस राहीले असताना अजूनही डोंबिवलीतील अनेक रस्त्यातील खड्डे बुजविले नाहीत.काही रस्त्यातील खड्डे खडी टाकून तात्पुरता स्वरूपात बुजविण्याचे काम सुरू आहे.यातच पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून शहरात स्वच्छता मोहिम राबविली जात आहे.
शनिवारी डोंबिवली पश्चिमेला रेती बंदर रोडवरील पालिकेच्या ‘ह’ प्रभाग क्षेत्र कार्यालयासमोर घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त अतुल पाटील , मुख्य आरोग्य निरीक्षक वसंत देगलूरकर यांसह कर्मचारी वर्ग यांनी स्वच्छता मोहीमे अंतर्गत रस्ते स्वच्छ करण्याचे काम सुरू होते.त्याच वेळी रिक्षाचालक मालक युनियनचे उपाध्यक्ष शेखर जोशी व काही रिक्षाचालकांनी उपायुक्त पाटील यांची भेट घेतली.श्री गणेशाचे आगमन करताना रस्त्यातील खड्डयांतून भक्तांना जावे लागणार ..स्वच्छता मोहिम राबवता मग रस्त्यातील खड्डे कधी बुजवणार ? असा जाब उपाध्यक्ष जोशी यांनी उपायुक्त पाटील यांना विचारला.
रिक्षाचालकांचे म्हणणे शांतपणे ऐकूण उपायुक्त पाटील म्हणाले, पालिका प्रशासनातील संबंधित विभागाकडून युद्धपातळीवर रस्त्यातील खड्डे बुजविण्याचे काम सुरू आहे.घनकचरा व्यवस्थापन विभागाकरून स्वच्छता मोहिम सुरू असून नागरिकांनी सहकार्य करा असे सांगितले. दरम्यान, स्वच्छता मोहीम शहराची गरज असून रस्त्यातील खड्डे बुजवणे आवश्यक झाले आहे.