29 C
Mumbai
Friday, May 5, 2023
Homeताजी बातमी २०२३ मध्ये जागतिक मंदीचे वातावरण ; भारत, बांगलादेशला फायदा होणार

२०२३ मध्ये जागतिक मंदीचे वातावरण ; भारत, बांगलादेशला फायदा होणार

दाव्होस : जगभरात २०२३ मध्ये मंदीचे वातावरण राहू शकते. अन्न सुरक्षा, ऊर्जा व महागाईचा मोठा परिणाम या वर्षभरात दिसणार आहे, असे निरीक्षण जागतिक आर्थिक परिषदेच्या सर्व्हेत नमूद केले आहे. मात्र, भारत व बांगलादेशला पुरवठा साखळीचा मोठा फायदा मिळू शकेल. मुख्य अर्थशास्त्राच्या सर्वेक्षणात दावा केला आहे की, दक्षिण आशियातील काही देश विशेष करून भारत व बांगलादेशला विकेंद्रीकरणाचा फायदा मिळू शकेल. जागतिक स्तरावर प्रमुख कंपन्या मंदीच्या भीतीने आपल्या खर्चात कपात करू शकतात.

इमारतीमधील घराला लागलेल्या आगीत आजी आणि नातू लेकीचा मृत्यू

महागाई व कंपन्यांच्या ताळेबंदाबाबत जगातील प्रमुख अर्थशास्त्रज्ञांनी या सर्वेक्षणात सकारात्मकता व्यक्त केली. जागतिक आर्थिक परिषदेचे प्रमुख अर्थशास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, भूराजकीय तणावामुळे जगाची अर्थव्यवस्था २०२३ मध्ये अडचणीत असेल. अमेरिका व युरोपमध्ये व्याजदरात वाढ होऊ शकते. २०२३ मध्ये जागतिक मंदीसारखे वातावरण असू शकते, तर १८ टक्के जणांनी सांगितले की, सप्टेंबर २०२२ मध्ये व्यक्त केलेल्या अंदाजापेक्षा याचे परिणाम दुप्पट असू शकतात. जागतिक आर्थिक परिषदेच्या व्यवस्थापकीय संचालक सादिया जाहिदी म्हणाल्या की, उच्च महागाई, विकास दरात घट, चढ्या दराने कर्ज यामुळे विकासदर घटता राहील. जागतिक नेत्यांनी आज अन्न, ऊर्जा, शिक्षण व कौशल्य विकास व रोजगार निर्मिती करणाऱ्या अर्थव्यवस्थेमध्ये गुंतवणूक केली पाहिजे.

मुख्यमंत्री दाव्होस परिषदेत सहभागी

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दाव्होस परिषदेत सहभागी होण्यासाठी तेथे पोहोचले असून तेथे ते राज्यात १.४ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. या दृष्टीने विविध देशांच्या व्यापारी शिष्टमंडळांशी ते चर्चा करणार असून परस्पर सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्याही करण्यात येणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

Translate »