29 C
Mumbai
Friday, May 5, 2023
Homeताजी बातमी २७ गावात अनधिकृत बांधकाम प्रकरणी २७ विकासकांवर गुन्हा दाखल

२७ गावात अनधिकृत बांधकाम प्रकरणी २७ विकासकांवर गुन्हा दाखल


डोंबिवली ( शंकर जाधव ) कल्याण- डोंबिवली महानगरपालिकेत काही वर्षांपूर्वी अनधिकृत बांधकाम हा विषय गंभीर बनला होता.या संदर्भात अग्यार समितीने चौकशी लावली होती.आता पुन्हा अनधिकृत बांधकाम प्रकरण सुरू झाले आहे.२०१७ पासून अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी २७ विकासकांवर मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.या प्रकरणी विकासकांना अटक केली जाईल असे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सहाय्यक नगररचनाकार सुजित पानसरे यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात २७ विकासकांवर गुन्हा दाखल केला आहे.कल्याण ग्रामीण परिसरातील २७ गावात २७ विकासकांनी सन २०१७ पासून आतापर्यत अनधिकृत बांधकाम करण्यासाठी कल्याण महानगरपालिकेच्या बनावट बांधकाम परवानग्या तयार केले. त्या आधारे त्याच्या मिळकती विकसित करून त्या ग्राहकांना विक्रि करून कल्याण- डोंबिवली महानगर पालिकेचा विकास अधिभार शुल्क न भरता कल्याण – डोंबिवली महानगर पालिकेची फसवणूक केल्याप्रकरणी भा.द.वि. 420, 465, 467, 488,471 कलमानव्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.गुन्हा दाखल झालेल्या विकासकांना अटक करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, अनधिकृत बांधकामे प्रकरणी आजवर पालिकेकडे अनेक लेखी तक्रारी आल्या असूनही प्रशासनाकडून कारवाई होत नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.तर प्रशासनाकडून कारवाई होत नसल्याने पालिका आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांडगे काय भूमिका घेतली हे लवकरच दिसेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

Translate »