महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल २०२२ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार आज दि. १७ जून,२०२२ रोजी दु. १:०० वा.ऑनलाईन जाहीर होईल. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांकडे त्यांचा रोल नंबर आणि आईचे नाव आवश्यक आहे.
आता दहावीच्या निकालाची पालक आणि विद्यार्थी वाट पाहत आहेत. १२वीचा निकाल ८ जूनला लागला. आता सर्वांचे लक्ष दहावीच्या निकालाकडे लागले आहे. बारावीचा निकाल दुसऱ्या आठवड्यात आणि दहावीचा निकाल जूनच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर होईल, असे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी सांगितले होते.
महाराष्ट्र बोर्ड 10वीचा निकाल (Maharashtra Board 10th Results ) पाहण्यासाठी तुम्हाला एक सोप्पी गोष्ट करायची आहे.
बारावीप्रमाणे दहावीचा देखील निकाल तुम्हाला आमच्या मायमराठीन्यूज च्या वेबसाईटवर पाहायला मिळणार आहे. तुम्हाला निकालाची घोषणा झाल्यावर मायमराठीन्यूज च्या वेबसाईटवर करिअर सेक्शनमध्ये कुठेही ही लिंक सहज उपलब्ध होणार आहे किंवा तुम्ही (www.maaymarathinews.com) इथे क्लिक करून सुद्धा तुमचा दहावीचा निकाल सहज मिळवू शकता.