29 C
Mumbai
Thursday, May 4, 2023
HomeKalyan-Dombivli२४० रहिवाश्यांनी बुलडोझर अडवला; तडा गेलेल्या इमारतीतील रहिवाश्यांना घराची लेखी हमी हवी

२४० रहिवाश्यांनी बुलडोझर अडवला; तडा गेलेल्या इमारतीतील रहिवाश्यांना घराची लेखी हमी हवी

डोंबिवली ( शंकर जाधव ) शनिवारी रात्री नऊ वाजण्याच्या डोंबिवली पूर्वेकडील शांती उपवन इमारतीला तडा गेल्याने घाबरलेल्या रहिवाशी घाबरून इमारतीबाहेर आले होते. रात्रभर रहिवाशी इमारतीच्या बाहेर उभे होते.पालिका प्रशासनाने दुसऱ्या दिवशी रविवारी सायंकाळी 6 वाजता बुलडोझर इमारत तोडण्यात आल्याचे समजताच नागरिकांनी कडाडून विरोध केला.संतप्त नागरिकांचा विरोध पाहता बुलडोझर मागे फिरवला.आम्हाला विकासकाने घर देण्याची लेखी हमी द्यावी अशी मागणी यावेळी रहिवाश्यांनी केली. शांती उपवन सोसायटीच्या इमारतीचे काही ठिकाणीचे स्लॅब (माती) कोसळत असल्याचे सोसायटीतील नागरिकांच्या निदर्शनास आल्याने रहिवाशांनी संपूर्ण वसाहत तातडीने खाली करण्यात आली आहे.शिवाय कोणत्याही प्रकारची वाईट घटना घडू नये या दृष्टीने महापालिका प्रशासन तसेच स्थानिक पोलीस ठाण्याचे अधिकारी सदर ठिकाणी दाखल झाले असून अग्निशमन दलाच्या गाड्या देखील घटनास्थळी दाखल झाल्या होत्या.इमारतीतील रहिवाशांना तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्था व जेवणाची सर्व सामाजिक संस्था व इतर इमारतीतील रहिवाश्यांनी करत असल्याचे काँग्रेस जिल्हा सरचिटणीस श्यामराव यादव यांनी दिली.दुसऱ्या दिवशी रविवारी सायंकाळी रहिवाश्यांना दुसऱ्या ठिकाणी राहण्याची तात्पुरती सोय करण्यात आली आहे. या घटनेने आम्ही रस्त्यावर असून आमच्या खिशात एक रुपयाही नाही.अश्या परिस्थिती आम्ही राहणार कसे, खाणार काय असा प्रश्न सोसायटी सचिव चंदन ठाकूर यांनी उपस्थित केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

Translate »