डोंबिवली ( शंकर जाधव ) कल्याण – डोंबिवलीत चार दिवसात २९ सर्पांची सर्पमित्रांनी सुखरूप सुटका करून जंगलात सोडले.कल्याण मध्ये 7 धामण , 1 हरण टोळ , 1 नाग,1 घोणस , 1 पाण्यातील दिवड , 1 कुकरी या सापांना पकडले गेले असल्याची माहिती सर्पमित्र दत्ता बोंबे यांनी दिली. तर डोंबिवलीत 1 धामण आणि 1 डूरक्या घोणस पॉज संस्थेतर्फे पकडण्यात आले तर सेवा या संस्थेतर्फे 7 धामण 5 नाग, 2 दिवड, 1 डूरक्या घोणस पकडण्यात आले. कल्याण एकूण 12 साप तर डोंबिवलीत 17 साप सर्प मित्रांनी पकडले आहेत. कल्याण डोंबिवली मिळून एकूण 29 सर्पांची सुखरूप सुटका केली. डोंबिवली पूर्वेतील नेकणी पाडा परिसरात असलेल्या एका गॅरेज मध्ये सोमवारी सकाळी एक डूरक्या घोणस आढळून आला. पॉज या संस्थेकडून या सापाची सुटका करण्यात आली आहे. हा डूरक्या घोणस एक ते दोन महिन्याचा असल्याचे पॉज संस्थेचे निलेश भणगे यांनी सांगितले. तर आज दुपारी चार फूट धामणीची सुद्धा डोंबिवलीतील गांधी नगर परिसरातून सुटका केल्याचे त्यांनी सांगितले. तर उसर घर, संदप, आयरे गाव या ठिकाणाहून नाग पकडल्याची माहिती सेवा संस्थेतर्फे देण्यात आली.