केंद्र सरकारने 5G स्पेक्ट्रमच्या लिलावाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे मार्च 2023 पासून भारतात 5G इंटरनेट (Internet) सेवा सुरू होण्याची अपेक्षा आहे. 5G चा वेग 4G पेक्षा 30 पट जास्त असेल. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून नेटिझन्स 5G ची वाट पाहत आहेत. आता त्यांची प्रतीक्षा संपली आहे. मात्र, 5G इंटरनेट सुविधा वापरल्याने त्यांच्या खिशावरही ताण पडेल. 5G इंटरनेटचे दर 4G पेक्षा दहापट जास्त असतील. मासिक 5G रिचार्ज प्लॅनसाठी, ग्राहकांना 10 ते 40 टक्के जास्त पैसे द्यावे लागतील.
सध्या अनेक दूरसंचार कंपन्या कर्जबाजारी आहेत. महागडे 5G स्पेक्ट्रम खरेदी करण्यासाठीही पैशांची गरज भासेल. यामुळे 5G इंटरनेटचे दर 4G पेक्षा महाग होतील. काही दिवसांपूर्वी टेलिकॉम (Telecom) कंपन्यांनीही स्पेक्ट्रम दरात कपात करण्याची मागणी केली होती.
दरम्यान, गेल्या काही दिवसांत जवळपास सर्वच टेलिकॉम कंपन्यांनी त्यांच्या 4G मासिक प्लॅनचे दर वाढवले आहेत. मासिक योजनेच्या दरात 10 ते 15 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांना दरमहा जादा पैसे मोजावे लागतात. आता पुढील वर्षी ग्राहकांना 5G सेवाही मिळणार आहे. मात्र, 4G पेक्षा हे दर दहा ते चाळीस टक्के अधिक महाग असतील. त्यामुळे तुम्हाला 5G सेवा वापरायची असेल, तर ग्राहकांना त्यासाठी जास्त किंमत मोजण्याची तयारी ठेवावी लागेल. ज्या देशांमध्ये 5G सेवा सुरू झाली आहे. जर तुम्ही त्या देशाच्या मासिक रिचार्ज प्लॅनवर नजर टाकली तर 5G रेट 4G पेक्षा 10 ते 40 टक्के जास्त महाग आहेत. जगातील पहिली 5G सेवा 2018 मध्ये दक्षिण कोरियामध्ये सुरू झाली.
मार्च 2023 पर्यंत भारतात 5G सेवा सुरू होण्याची अपेक्षा आहे. सध्या 5G सेवा 61 पेक्षा जास्त देशांमध्ये ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. भारत लवकरच या देशांमध्ये सामील होणार आहे. पहिल्या टप्प्यात मुंबई, बेंगळुरू, चेन्नई, चंदीगड, दिल्ली, हैदराबाद, कोलकाता या देशातील 13 मोठ्या शहरांमध्ये 5G सेवा सुरू करण्यात येणार आहे.