डोंबिवली (शंकर जाधव)
पोलीस स्थापना दिनाच्या निमित्ताने कोळशेवाडी वाहतुक उप विभाग हद्दीतील डोंबिवली पूर्वेकडील मानपाडा चौक, सुयोग रिजन्सी चौक, टाटा नाका या ठिकाणी एका खाजगी रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने प्रतिकात्मक यमराजास पाचारण करुण मोटार वाहन कायद्याचे नियम मोडणाऱ्या वाहन धारकांना पुष्पगुच्छ देवून वाहतूक नियमांची माहिती देऊन जनजागृती केली. याप्रसंगी पोउपनि वाघ, कावडे, अंमलदार व परिसरातील अनेक नागरीक उपस्थित होते.