डोंबिवली : ( प्रथमेश जाधव ) डोंबिवलीकरांचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी डॉ. रोहित बोबडे यांनी डोंबिवली ईस्ट ला नेहरू मैदान, मानपाडा रोड येथे लोटस क्लिनिक चालू केले, इथे ह्रदयाचे आजार , फुफुसाचे आजार, मधुमेह, मेंदूचे विकार, याचे निदान येथे केले जातील. डॉ. रोहित बोबडे यांनी त्याचे एम. एम. बी. एस. चे शिक्षण सायन येतील नावाजलेले सायन हॉस्पिटल येते पूर्ण केले आहे. तसेच त्यांनी त्यांचे एम.डी. मेडिसिन चे पुढील शिक्षण हे कराड मधील सूप्रसिद्ध कृष्णा रुग्णालय येथे पूर्ण केले . काल लोटस क्लिनिक ओपन करून ते डोंबिवलीकरांच्या सेवेत रुजु झाले. उदघाट्न खूप छान आणि आनंदी वातावरणात झाले. डोंबिवलीतील स्थानिक नगरसेवक संन्मानिय श्री. संदीप पुराणिक साहेब यांच्या हस्ते या लोटस क्लिनिक चे उदघाट्न झाले.
तसेच इतर मान्यवरांनी येऊन डॉ. रोहित यांना शुभेच्या तसेच त्यांचे अभिनंदन केले.
डॉ. रवींद्र बोबडे (वडील ), सौ. सुहासनि बोबडे (आई), डॉ . स्वाती बोबडे (पत्नी), डॉ. सोनल सारंग बोरुडे (बहीण) हे परिवारातील सदस्य येत उपास्थीत होते.
तसेच डोंबिवलीतील मान्यवरांनी या उद्घटनाला उपस्थिती लावली होती.
डोंबिवली मधेच सेवेत असणारे कित्येक डॉक्टरांनी उदघाट्न प्रसंगी हजेरी लावून डॉ. रोहित यांना शुभेच्या दिल्या. डॉ प्रतीक मोरे, डॉ दिनेश पवार, डॉ तुषार पाटील, डॉ जयेश पाटील, कोमलसिंग पाटील, चैतन्य बोरसे, डॉ कुमार, डॉ विजय, डॉ शशांक कदम, डॉ उमेश पाटील, डॉ रोहन कुमार, दिलीप भगत, डॉ पूर्वा चौधरी, डॉ ज्ञानदेव पाटील, सौ गायकवाड मॅडम, सोनाली हॉटेल चे संदीप केळकर, डॉ देव राठोर अशा अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शविली.

सोलापूर येथील माढा तालुक्यातील पहिले कोविड सेन्टर डॉ. रोहित बोबडे यांनी चालू करून एक आदर्श घालून दिला होता. त्यांचे वाडील डॉ. रवींद्र बोबडे एक सुप्रसिद्ध डॉक्टर असून मागील ३० वर्षापासून लोकांच्या सेवेत रुजू आहेत. रोटरी क्लब मधून हे समाज सेवा करत असतात. माढा तालुक्यातून कोविड प्रसंगी चांगली सेवा दिल्या बध्दल डॉ. रोहित बोबडे याचा सम्मान सुद्धा झाला आहे.