डोंबिवली ( शंकर जाधव )
मध्य प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, बिहार या राज्यातून चार लाख रुपये किमतीचे एकूण ३७ मोबाईल फोन जे हरवलेले आणि चोरीला गेलेले होते.मंगळवारी ते मोबाईल शोधून ते मूळ मालकांना डोंबिवली मानपाडा पोलिसांनी परत केले.
मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवली मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत जानेवारी पासून ते ऑक्टोंबर दरम्यान विविध ठिकाणाहून हरविलेले मोबाईल शोधण्यासाठी पोलिसांनी पथक तयार केले होत्व. पथकाने गेल्या दहा महिन्यात महाराष्ट्र,उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, बिहार या राज्यातून चार लाख रुपये किमतीचे एकूण ३७ मोबाईल फोन शोधले.मंगळवारी डोंबिवली मानपाडा पोलिसांनी मोबाईल मालकांना मोबाईल परत केले आहे. यावेळी डोंबिवली सहायक पोलीस आयुक्त सुनील कुऱ्हाडे यांनी central equipment indentity register ( CEIR) या वेबसाईट वर तक्रारदाराने मोबाईल हरवल्याची तक्रार करा संबधित कागदपत्र अपलोड करा असे आवाहन केले होते.