गेल्या अनेक दिवसांपासून येऊरमधील नंगानाच, डिजेचा कर्णकर्कश आवाज या विरोधात आदिवासींनी एल्गार पुकारला आहे. त्यानंतर वनखाते सक्रीय झाले असून गुरुवारी झालेल्या बैठकीत येऊरमध्ये प्रवेश करण्यासाठी रात्री १० वाजता आणि येऊरहून ठाण्यात परतण्यासाठी रात्री ११ वाजता प्रवेश बंद करण्यात येणार आहेत. त्यामुळे रात्री ११ ते सकाळी ७ वाजेपर्यंत येऊरमध्ये कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. रात्री 11 नंतर येऊरमधून कोणालाही बाहेर पडू दिले जाणार नाही.
ठाणे शहराच्या पश्चिमेला संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे. या उद्यानात अनेक वन्य प्राणी, पक्षी आणि आदिवासींचे वास्तव्य आहे. मात्र हळूहळू जंगल नाहीसे होत असल्याने स्थानिक आदिवासींनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. रात्रभर पार्ट्या, मोठ्या आवाजात डीजे, रात्रभर क्रिकेटचे सामने, दारू आणि अंमली पदार्थांची विक्री, जंगलात कचरा टाकणे, येऊरमध्ये अनधिकृत पार्किंगसह नंगा नाच हे सर्व खुलेआम सुरू असून आदिवासी बांधवांनी ‘येऊर जंगल वाचवा’ अभियान सुरू केले आहे.
येऊर आदिवासी वनहक्क समितीच्या वतीने आक्रमक पवित्रा घेत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी 4 एप्रिल रोजी वनविभाग, ठामपाच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत येऊरमधील बेकायदा बांधकामे आणि सुरू असलेल्या दुरवस्थेवर चर्चा करण्यात आली. आज पुन्हा त्याच विषयावर मुंबईत बैठक झाली. या बैठकीत येऊरच्या प्रवेशाबाबत निर्णय घेण्यात आला. मुनगंटीवार यांनी येऊरमध्ये रात्री १० नंतर संचारबंदीचे आदेश दिले.
या कारणावरून वनमंत्र्यांनी नाराजी केली
4 एप्रिल रोजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीत येऊर येथील बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्याचे आदेश ठामपाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले. मात्र, दहा दिवस उलटूनही कोणतीही कारवाई न झाल्याने वनमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केल्याचे समजते.