डोंबिवली (शंकर जाधव)
प्रवाशाची रिक्षात विसलेली बँग परत केल्याने वाहतूक शाखा कल्याण पोलिस आयुक्त वाहतूक शाखा मंदार धर्माधिकारी यांनी कौतुक केले. यावेळी डोंबिवली वाहतूक शाखेचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक उमेश गीत्ते उपस्थित होते.
‘चांगल्या मुलींना विमलवाले आवडतात.’ सई झाली ट्रोलिंगची शिकार
रिक्षाचालक रमेश गणपत रांजने यांच्या रिक्षातून ११ तारखेला संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास डोंबिवली पूर्वेककडील मिलापनगर परिसरातून दिनेश जयगडकर स्टेशनजवळ उतरले. मात्र घाईघाईत उतरताना जयगडकर आपली बँग रिक्षातच विसरले. प्रवासी निघून गेल्यावर रीक्षा चालकाच्या लक्षात आले कि प्रवासी रिक्षात बँग विसरले आहेत. रांजणे यांनी बँग वाहतूक शाखा डोंबिवली येथे आणून दिली.
डोंबिवलीतील टिळकनगर शाळेत भरली भाजी मंडई
वाहतूक पोलिसांनी बँग तपासली असता त्यात रोख ३०, ००० रुपये असल्याचे पाहिले. काही वेळानी जयगडकर हे डोंबिवली वाहतूक पोलिसांकडे आले. जयगडकर यांना बँग दाखविल्यावर त्यांनी बँग आपलीच असल्याचे सांगितले.