धर्मवीर आनंद दिघे (Dharmaveer Anand Dighe) यांचा पुतण्या केदार दिघे (Kedar Dighe) याने बलात्कार पीडितेला धमकी दिली. याप्रकरणी ना.म जोशी मार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केदार दिघे यांची ठाणे जिल्हाप्रमुख म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी नियुक्ती केली होती; मात्र त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यापासून राजकारणात खळबळ उडाली आहे.
केदार दिघेंचा मित्र आणि मुख्य संशयित रोहित कपूर यांनी २८ जुलै रोजी लोअर परळ येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये एका तरुणीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. धनादेश देण्यासाठी कपूरने पीडितेला हॉटेलमध्ये बोलावून तिच्यावर बलात्कार केला. पीडितेने याबाबत तक्रार करू नये म्हणून केदार दिघे यांनी तिला धमकी दिल्याचा आरोप पीडितेने केला आहे.
नागरिकत्व कायदा लवकरच लागू ; अमित शहा यांनी दिले संकेत
२३ वर्षीय पीडित महिला एका खासगी कंपनीत कामाला असून रोहित कपूरने या महिलेला २८ जुलै रोजी सेंट रेगिस हॉटेलमध्ये जेवणासाठी बोलावले होते. महिला त्या खोलीत गेल्यावर रोहित कपूरने तिच्यावर बलात्कार केला. सुरुवातीला महिलेने या घटनेबाबत कोणालाही सांगितले नाही. मात्र १ ऑगस्ट रोजी रोहित कपूर याने त्यांचा मित्र केदार दिघे यांच्या मध्यस्थीने महिलेला या घटनेबाबत कोणाला काहीही सांगू नये असे सांगितले, मात्र महिलेने थेट तक्रार केली. रोहित कपूर आणि केदार दिघे यांच्याविरोधात जोशी मार्ग पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. केदार दिघेंवर भारतीय दंड संहितेच्या कलम ५०६ अन्वये आणि मित्र रोहित कपूरविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६ अन्वये बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.