डोंबिवली (शंकर जाधव) :- शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्वेश सरनाईक यांच्या विनंतीनुसार युवा सेना पदाधिकारी जाहीर करण्यात आले.युवा सेना सचिव पदी माजी नगरसेवक तथा स्थायी समिती माजी सभापती दीपेश म्हात्रे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.यानिमित्त शिवसेना डोंबिवली मध्यवर्ती शाखेच्या वतीने म्हात्रे यांचा कौतुक सोहळा पार पडला.

यावेळी उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे , महिला आघाडी लता पाटील,माजी नगरसेवक रवी पाटील, संतोष चव्हाण, गजानन व्यापारी, प्रकाश माने, सागर जेधे, समीर कवडे, आदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.यावेळी उपस्थित शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दीपेश म्हात्रे यांचे पुष्पगुच्छ देऊन कौतुक केले. शहरप्रमुख राजेश मोरे म्हणाले, शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे व खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी डोंबिवलीतील एका पदाधिकाऱ्यांला एवढ्या मोठ्या पदावर नेऊन ठेवले हा डोंबिवलीकरांसाठी कौतुकाची बाबा आहे.तर उपजिल्हाप्रमुख राजेश कदम म्हणाले, दीपेश म्हात्रे यांच्यावर जबाबदारी वाढली आहे.पुढे दीपेश म्हात्रे म्हणाले, मी वयाच्या 23 व्या वर्षी नगरसेवक झालो.,माझे वडील पुंडलिक म्हात्रे यांनी मला संगितले होते की कार्यकर्ते जपा.त्यातून प्रेरणा घेऊन मी पक्षाचे काम करत आहे.कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे हे दिवसरात्र जनतेची सेवा करत आहे.शिवसेने पक्षप्रमुख एकनाथ शिंदे हे वयाच्या 60 व्या वर्षीही काम करताना दिसतात. कोविड काळात शिंदे यांचे काम जनतेला माहीत आहे. अश्या नेत्याकडून शिकण्यासारखे खूप काम आहे.मी युवा सेनेची स्थापना झाल्यापासून काम करतोय.युवा सेना सचिव पदी नियुक्ती हे माझ्या कामाची पोचपावती आहे.मुख्यमंत्री शिंदे यांचे पक्षातील प्रत्येक कार्यकर्त्याची दखल घेतली जाते.