डोंबिवली ( शंकर जाधव )
कल्याण पश्चिम दरवर्षी कार्तिक स्नान महोत्सव संपन्न होत असतो. कोजागिरी पौर्णिमेपासून ते त्रिपुरारी पोर्णिमेपर्यंत हा महोत्सव सुरू असतो. पहाटे 4 ते 6 या वेळेत काकडा आरती भजन व देवीची पूजा पार पडते. दरम्यान माजी आमदार नरेंद्र पवार यांनी कर्नाळादेवी मंदिर, तसेच नमस्कार मंडळ येथे अप्पामहाराज लेले समाधी मंदिर आणि शिवाजी चौक येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर या ठिकाणी भेटी दिल्या आणि दर्शन घेतले.
वारकरी सांप्रदायाच्या क्षेत्रातील महत्वाच्या आणि आध्यात्मिक अधिष्ठान असलेल्या महाराज आणि संतांची मांदियाळी या महोत्सवाला मोठ्या प्रमाणात असते. पूर्णतः एक महिना चालणाऱ्या या महोत्सवात वारकरी संप्रदायाचे कथन आणि श्रवण होते, अनेक दिग्गज विचारवंत यामध्ये सहभागी होत असतात. रोजच्या कामातून वेळ काढत या अशा अध्यात्मिक कार्यक्रमांना उपस्थिती लावल्यानंतर सकारात्मक ऊर्जा मिळत असल्याचे मत भाजपा भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश संयोजक तथा माजी आमदार नरेंद्र पवार यांनी बोलताना व्यक्त केले.
यावेळी कल्याण जिल्हा अध्यत्मिक आघाडी संयोजक चंद्रभान महाराज सांगळे, वारकरी संप्रदाय कल्याण शहर अध्यक्ष नेहरकर मामा, ह.भ.प. शिवाजी महाराज धुमाळ, पोलीस पाटील ह.भ.प. रघुनाथ म्हात्रे, अर्जुन म्हात्रे, भगवान म्हात्रे, ह.भ.प विठ्ठल केणे, प्रल्हाद भोईर, नारायण म्हात्रे, रामदास म्हात्रे, रोहन म्हात्रे, काशिनाथ पितांबरे, शरद काळे, विलास मोरे, विठ्ठल महाराज साबळे, प्रमोद बोंद्रे, धोंडू लांघी, तुकाराम साळुंके, कृष्णा ठाकूर, मृत्युंजय शुक्ला आदी संत, वारकरी व माऊली हरिपाठ मंडळ, कर्नाळा देवी महिला भाजनी मंडळ, कर्नाळा देवी भजन मंडळी, कुंदाताई उगले महिला भजनी मंडळ, लेले कुटुंबीय उपस्थित होते.