
भरारी प्रकाशनच्या वतीने राज्यस्तरीय स्वरचित गुढकथालेखन स्पर्धेचे आयोजन २०२१ मध्ये केले होते. या स्पर्धेसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून लेखकांनी स्वलिखित गुढ कथा पाठविल्या होत्या. हा पुरस्कार ज्येष्ठनाटककार, सुप्रसिद्ध गुढकथाकार कै.रत्नाकर मतकरी (Ratnakar Matkari) यांच्या नावाने देण्यात आला. निवड झालेल्या कथा २०२१ च्या ‘ताऱ्यांचे जग’ या दिवाळी अंकांमध्ये समाविष्ट केल्या आहेत. डॉ. या कथांचे परीक्षण डॉक्टर कृष्णा नाईक (रत्नाकर मतकरी यांच्या गूढ कथांवर पीएचडी केली आहे.) यांनी व कथाकार गुरुनाथ तेंडुलकर (Gurunath Tendulkar) यांनी परीक्षक म्हणून चोख भूमिका बजावली. खालील कथांची निवड पुरस्कारासाठी झाली आहे. त्या विजेत्या कथालेखकांचे हार्दिक अभिनंदन.
मध्यंतरी कोरोनाच्या काळामध्ये कार्यक्रम झाले नाहीत आणि रत्नाकर मतकरी यांच्या प्रथम स्मृती दिवसाच्या निमित्ताने कथा स्पर्धेचा पुरस्कार समारंभ करणार होतो, परंतु त्या काळात लॉक डाऊन असल्यामुळे कार्यक्रम घेण्यास विलंब झाला. परंतु यावर्षी रत्नाकर मतकरी यांच्या द्वितीय स्मृतिदिनाच्या निमित्ताने मा. विनीत गोरे यांनी दिनानाथ नाट्यगृहात 17 मे रोजी संध्याकाळी 8.30 वाजता दिनानाथ नाट्यगृहात कार्यक्रमाचे आयोजन केले आहे या कार्यक्रमांमध्ये रत्नाकर मतकरी यांच्या सुविद्य पत्नी आदरणीय प्रतिभाताई यांच्या हस्ते हा पुरस्कार वितरित करण्यात येणार आहे. याचा मला विशेष आनंद आहे.
पुरस्कृत कथा
१)प्रथम : किल्ले शहागड – शरद पुराणिक
२)द्वितिय: बंदी : राजश्री बर्वे
३) तृतीय: मोगऱ्याची फुले : सप्तर्षी माळी
लक्षणिय कथा (उत्तेजनार्थ)
अ) त्या रात्री – लीना माटे
अ) फार्महाऊस – विराज चव्हाण
क) तीसरी मंजिल – सुमन नवलकर
लता गुठे
प्रकाशिका भरारी प्रकाशन