डोंबिवली (शंकर जाधव)
अल्पा जगताप हिने डोंबिवलीतील यश जिमखाना मध्ये एकच महिना सराव माने व रवि यांच्या मार्गदर्शनाखाली दररोज 5 ते 6 तास यश जिमखाना मध्ये सराव केला. यश जिमखाना मालक राजू वडनेरकर यांनी तिला रात्रीचा सरावासाठी स्विमिंग पूल उपलब्ध करून दिला. समर व्हेकेशन बॅचेस सुरू असताना सुद्धा परवानगी दिली.यश जिमखाना व्यवस्थापक मनोज सापरा,पतंगे यांचे मार्गदर्शन मिळाले. महिन्यातून 2 वेळेस उरण येथील समुद्रात संतोष पाटील यांच्याकडे घेऊन जात होतो.
अल्पा जगताप ही कल्याण सांगलेवाडी येते राहते. ती गुरुनानक स्कूल मध्ये सहावीत शिकते.अल्पा ने नुकत्याच पार पडलेल्या मुंबई येथे राज्य स्तरीय सागरी जलतरण स्पर्धेत 2 किलोमीटर मध्ये उत्तम कामगिरी केली. तसेच जिल्हा स्तरीय शालेय क्रीडा प्रकारात प्रथम क्रमांक पटकावला. अल्पा जगताप हिने एलिफंटा येथून सकाळी 6 वाजून 37 मिनिटांनी महाराष्ट्र राज्य जलतरण संघटनेचे निरीक्षक सुनील मयेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पाण्यात सुर मारून आपले पोहणे चालू केले.
भर उन्हाचा तडाखा, मध्ये गॉगल मध्ये पाणी जात होते. बोटी व मोठी मोठी जहाजे त्यांचे येणे जाणे चालूच होते. त्यांच्या लाटा नंतर वेगाने वाहणारे सोसाट्याच्या वारा कधी कधी वातावरण बदलत होते. कधी ऊन कधी सावली या सर्व बाबींचा सामना करत तिने मांडवा बीच येथे दुपारी 12 वाजून 28 मी. हे सागरी जलतरण अंतर पार केले. तिला एकूण 5 तास 51 मी. लागली. उपस्थीत लोकांनी टाळ्यांच्या कडकडात तिचे जंगी स्वागत केले. आतापर्यंत एलिफंटा ते मांडवा बीच हे सागरी जलतरण अंतर मुलीनी कोणीच केले नाही.त्यामुळे तिने हा नवीन रेकॉर्ड प्रस्थापित केला. आल्पाचे प्रशिक्षक विलास माने, रवि नवले,अरुण धबाले आदींनी तिचे स्वागत केले. व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.