वाकेड (Waked) येथील पू. प्रा. मराठी शाळा क्र. १ या शाळेतील भावेश वसंत वाडेकर (Bhavesh Vadekar) याने जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत यश प्राप्त केले आहे. १० जुलै रोजी त्याची निवड झाल्याबद्दल राष्ट्रीय रविदास परिषद, लांजा तालुक्यातर्फे भावेशचा त्याच्या राहत्या घरी सत्कार करण्यात आला. तसेच पुढील वाटचालीसाठी त्याला शुभेच्छा देण्यात आल्या.
या सत्कार समारंभाला आपल्या राष्ट्रीय रविदास परिषद कोकण विभागाचे अध्यक्ष श्री. एस. व्ही. कदम, राष्ट्रीय रविदास परिषदेचे लांजाचे अध्यक्ष श्री. भिकाजी चव्हाण, उपाध्यक्ष श्री. प्रकाश गवाणकर, उपाध्यक्ष श्री. अमरदीप चव्हाण, सचिव श्री. प्रदीप चव्हाण, सह सचिव श्री. ऋषिकेश चव्हाण,कार्याध्यक्ष श्री. अरुण वाडेकर, सल्लागार श्री. मंगेश जाधव , श्री. दीपक चव्हाण श्री. प्रकाश जाधव हे सदस्य उपस्थित होते. तसेच रविदास मंडळाचे पदाधिकारी व सदस्य देखील उपस्थित होते. भावेशला हे यश प्राप्त करण्यासाठी श्री शेंडगे सर व मुख्याध्यापक संजय डंबे यांचे मार्गदर्शन लाभले.