डोंबिवली (शंकर जाधव)
2 ते 12 जानेवारी ते 2023 या कालावधीत पुणे येथे महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक खेळ आयोजित करण्यात आले आहेत. भोईर जिमखाना जिम्नॅस्ट्सने ठाणे जिल्ह्यातून स्पर्धेसाठी प्रतिनिधित्व करत सर्वोत्कृष्ट संघ म्हणून सुवर्णपदक जिंकले.
मनेश गाढवे, अथर्व टेमकर, वरद सावंत आणि मानस घोडेक, भोईर जिमखाना जिम्नॅस्ट आदर्श भोईर आणि आयुष मुळ्ये यांनी वैयक्तिक पुरुष ट्रॅम्पोलिनमध्ये सुवर्ण आणि रौप्य पदक जिंकले. त्याचप्रमाणे राही पाखले आणि ब्रीड यांनी वैयक्तिक महिला ट्रॅम्पोलिनमध्ये सुवर्ण आणि रौप्य पदक जिंकले.
चिखलात लोळून मुख्याध्यापकाची प्रशासनावर नाराजी
सर्व विजेत्यांचे अभिनंद रमेश पाटील, मुकुंद भोईर, रवींद्र शिर्के, नंदकिशोर तावडे, अनिता जाधव यांनी केले. महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत विजेत्यांचे कौतुक करण्यात आले.