डोंबिवली ( शंकर जाधव ) डोंबिवली एमआयडीसी निवासी विभागातील नवचैतन्य नगर उद्यानाच्या विकास कामांसाठी मनसे आमदार प्रमोद (राजु ) पाटील यांच्या आमदार निधीतून २५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. या विकासकामाचे भूमिपूजन स्थानिक नागरिकांच्या हस्ते करण्यात आले.या सोहळ्याला डोंबिवली एमआयडीसी परिसरातील सर्व ज्येष्ठ मंडळी,जिल्हा संघटक हर्षद पाटील, विधानसभा सचिव अरुण जांभळे, उपशहर अध्यक्ष प्रभाकर जाधव, प्रेम पाटील विद्यार्थी सेना जिल्हा सचिव प्रितेश पाटील, विभाग अध्यक्ष संजय चव्हाण, प्रदीप चौधरी, शाखा अध्यक्ष सुरज शिंदे, खोत , महिला विभाग अध्यक्ष ज्योती पाटील, महिला शाखाध्यक्ष, अनिल वालेकर वाहतूक सेना,शाखाध्यक्ष, जतीन पाटील रवि गरुडे विभाग अध्यक्ष, बबलू मोरे शाखाध्यक्ष,सचिन माने , महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अनेक स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी आमदार पाटील म्हणाले, २५ लाख निधी हा माझ्या खिशातला नसून हा सरकारचा पैसा आहे. काम होत असताना कामाकडे चागले लक्ष द्या आपली काम चांगली झाली पाहिजे. त्याच बरोबर त्यांनी जागरूक नागरिकांचे कौतुकही केले.सगळ्यांना एकत्र घेऊन इथल्या विभागातील काम दर्जेदार कसे होतील याचा प्रामाणिक प्रयत्न करेल असा विश्वासही आमदार पाटील यावेळी व्यक्त केला. एम आय डी सी विभागातील नागरिकांना दिला. नागरिकांनी रस्त्याच्या दुरवस्थेबाबत आमदार यांना गर्ह्याने मांडले असता लवकरच रस्ते चांगले कसे होतील यासाठी ही जे पाहिजे ते प्रयत्न करणार असही ते म्हणाले.