अलीकडच्या काळात परिणीती चोप्रा राजकारणी राघव चढ्ढासोबतच्या लग्नाच्या अफवांमुळे चर्चेत आहे. दोघांनी अद्याप त्यांच्या नात्याबद्दल काहीही स्पष्ट केले नाही, परंतु ताज्या रिपोर्टनुसार, असे दिसते आहे की दोघांनी आधीच गुपचूप साखरपुडा केला आहे. तसेच, हे दोघे यावर्षी ऑक्टोबरमध्ये लग्न करणार आहेत. आघाडीच्या वृत्तपत्र इंडिया टुडेच्या मते, परिणिती आणि राघव यांनी जवळच्या कुटुंबातील सदस्यांच्या उपस्थितीत पारंपारिक रोका समारंभात सहभाग घेतला. “परिणिती आणि राघवचा रोका संपला आहे. हे कौटुंबिक आणि खाजगी प्रकरण होते आणि ते दोघेही खूप आनंदी आहेत. या वर्षी ऑक्टोबरच्या अखेरीस दोघे विवाहबंधनात अडकणार आहेत.
परिणिती आणि राघव यांना घाई नाही आणि लग्नाच्या करण्यापूर्वी त्या दोघांकडे कामाची कमिटमेंट आहेत,लग्नापेक्षा कामाला महत्व देणं आणि त्याची काळजी घेणे आवश्यक आहे” परिणीती आणि राघव यांनी सांगितलं आहे. याशिवाय परिणीतीची चुलत बहीण अभिनेत्री प्रियांका चोप्रा Jio MAMI फिल्म फेस्टिव्हलसाठी भारतात येणार आहे. म्हणूनच प्रियंका भारतात येण्यानिमित्ताने परिणीती आणि राघवच्या लग्नालाही ती उपस्थित राहणार आहे. आम आदमी पार्टीचा नेता राघवसोबत परिणीती अनेकदा शहरात दिसली तेव्हापासून त्यांच्या डेटिंगच्या अफवा इंटरनेटवर फिरू लागल्या. त्यानंतर लगेचच हे जोडपे एप्रिलमध्ये लग्नबंधनात अडकणार असल्याची अफवा पसरली होती. काहीच घडलं नाही.
दरम्यान, जेव्हा परिणीतीला पापाराझींनी तिच्या लग्नाबद्दल विचारले तेव्हा तिने हसतमुखाने उत्तर दिले – जरी तिने काहीही स्पष्ट सांगितले नाही. काही दिवसांपूर्वी परिणीती आणि राघव अतिशय साध्या पोशाखात स्पॉट झाले होते. त्यावेळी परिणीती आणि राघवच्या बोटांवरील चमकणाऱ्या अंगठ्यांकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले. अशातच दोघांची एंगेजमेंट झाली आणि ऑक्टोबरमध्ये ते लग्न करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.