बिगबॉस (Bigboss) या लोकप्रिय शो च्या पहिल्या ३ सिझनच्या (Season) प्रचंड प्रतिसादानंतर ४था सिझन कधी येईल ही प्रेक्षकांची आतुरता शिगेला पोहोचली असतानाच ४था सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कलर्स मराठीने (Colors Marathi) बिगबॉस सिझन ४ चा टिझर प्रदर्शित करत आता सिझन कधी चालू होईल ही सर्वांची उत्कंठा वाढवली आहे. बिगबॉस मधील टास्क (Task), भांडणे, मैत्री (Friendship) हे सर्व अनुभवायला प्रेक्षक (Audience) वाट पाहत आहेत.
कलर्स मराठीने शेअर केलेला प्रोमो एकदम हटके पद्धतीचा आहे. या व्हिडीओला मराठी मनोरंजनाचा Bigg Boss येतोय, लवकरच…आपल्या कलर्स मराठीवर, असे कॅप्शन देण्यात आले आहे. कलर्स मराठी, बिग बॉस मराठी ४, BBM4, हे हॅशटॅग वापरण्यात आले आहेत. त्यासोबत रंग मनाला भिडणारे असा हॅशटॅगही हा टिझर प्रदर्शित करताना देण्यात आला आहे. याचा पर्वाशी काय संबंध हे पाहण्यासारखे आहे.
यंदाच्या या पर्वात बिग बॉसच्या घरात या वेळेस नेमकं कोण कलाकार असतील याची चर्चा सुरू झाली आहे. पण हे पर्व पहिल्या तिन्ही पर्वांपेक्षा वेगळे असणार आहे असे प्रेक्षांचे मत आहे.पहिले ३ सिझन तर अगदी एका पेक्षा एक होते. तरीही तिसरा सिझन आता पर्यंतचा सर्वात हिट सिझन ठरला. बिगबॉसच्या घरातून बाहेर पडूनही स्पर्धक अजूनही प्रेक्षकांचे मनोरंजन करतंच असतात.
बिगबॉस मराठी सिझन ४ च्या नुसत्या टिझरने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढवली आहे. आता या पर्वात कोण असेल आणि हे पर्व कसे गाजणार हे देखील बघण्यासारखे आहे.