पश्चिम बंगालचे भाजपचे (BJP) नेते शुभेंदू अधिकारी यांनी मंगळवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांची भेट घेत नागरिकत्व कायदा (CAA) लवकरात लवकर लागू करण्याची विनंती केली. कोरोना लसीचा प्रिकॉशन डोस (Corona vaccine precaution dose) देण्याची मोहीम पूर्ण झाल्यानंतर नागरिकत्व कायदा लागू केला जाईल; मात्र या कायद्यासाठी नियम बनवण्याचे काम सुरू असल्याचे अमित शहा यांनी सांगितले.
डिसेंबर २०१९ मध्ये संसदेद्वारे पारित अधिनियमाचे नियम निश्चित न झाल्यामुळे हा कायदा लागू केला नाही. केंद्र सरकारने कोरोना महामारीचा हवाला देऊन नागरिकत्व कायद्याच्या नियमावलीस विलंब झाल्याचे सांगितले आहे. जवळपास तीन वर्षांपूर्वी केंद्र सरकारने नागरिकत्व कायदा लागू करणार असल्याचे म्हटले होते. त्यावेळी संपूर्ण देशातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. यानंतर हा मुद्दा चर्चेत आला आहे.