29 C
Mumbai
Friday, May 5, 2023
Homeताजी बातमी BJP: भाजपची मनसेला ऑफर? राज ठाकरे काय घेणार भूमिका?

BJP: भाजपची मनसेला ऑफर? राज ठाकरे काय घेणार भूमिका?

गेल्या महिन्यात महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक घडामोडी घडल्या. एकनाथ शिंदेंनी शिवसेनेतील आमदारांसह महाविकास आघाडी विरोधात भूमिका घेतली. त्यांना अनेक अपक्ष आमदारांनी देखील साथ दिली.

उद्धव ठाकरे सरकार विरोधात ५० आमदारांनी भूमिका घेतल्यामुळे मविआ सरकार अल्पमतात आले. त्यामुळे बहुमत चाचणी होण्यापूर्वीच उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री बनले.

शिंदे सरकारच्या कॅबिनेट विस्ताराबाबत अनेक चर्चा होत आहेत. एका वृत्तानुसार मनसेला भाजपने (BJP) मोठी ऑफर दिली आहे. त्यामुळे राज ठाकरेंच्या भूमिकेकडे देखील सर्वांचे लक्ष आहे.

भाजपने राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांचा मंत्रिमंडळात समावेश करावा अशी ऑफर दिली आहे. अमित ठाकरे विधान सभा किंवा विधान परिषद सभागृहाचे सदस्य नाही. तरी भाजपने ही ऑफर दिली आहे.

पण मनसेने अशी कोणतीही ऑफर माहित नसल्याचं सांगितलं आहे. भाजपनेही त्यावर कोणतेही उत्तर दिलेले नाही.

Electricity Bill: शिंदे सरकारने सर्वसामान्यांना दिला विजेचा झटका?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अमित ठाकरेंना मंत्रिमंडळात आणण्यासाठी विशेष आग्रह करत आहेत. फडणवीस ठाकरेंसोबत लवकरच बैठक बोलावणार आहेत.

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने उद्धव ठाकरेंसमोर मोठे आवाहन निर्माण झाले आहे. शिंदे गटात केवळ आमदारच नाही तर खासदार व नगरसेवक ही सहभागी आहेत.

मुंबईत शिवसेनेच्या माजी नगरसेविका शीतल म्हात्रे यांनीही शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यांच्यासोबत आणखी काही नगरसेवक सुद्धा शिंदे गटात जातील अशा चर्चा आहेत.

त्यात भाजपा मनसेला पाठिंबा देऊन मविआला शह देण्याचे प्रयत्न करत आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंसमोर मोठे आवाहन आहेत. तसेच मागील काही काळात मनसे आणि भाजप जवळ आल्याचे पाहायला मिळत आहे.

या सर्वात भाजपाच्या विनंतीमुळे राज ठाकरेंच्या एकमेव आमदाराने विधानसभेत शिंदेंच्या बाजूने मत दिले होते. त्यामुळे येत्या काळात मनसे देखील सत्तेत सहभागी होईल का याची उत्सुकता सर्वांना आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

Translate »