डोंबिवली (शंकर जाधव)
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे ४ जानेवारी रोजी डोंबिवलीत कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी येणार आहेत. सकाळी कल्याण येथे कार्यकर्त्यांना भेटणार असून दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास डोंबिवली भाजप ग्रामीण मंडळ कार्यालयात कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. सरकारी योजनांचे लाभार्थ्याशी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास डोंबिवली पूर्वेकडील ठाकूर सभागृहात बोलणार आहेत. पुढे रात्री आठ वाजता सावरकर उद्यान येथील भाजप जनसंपर्क कार्यालयात पत्रकार परिषद घेणार आहेत. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, डोंबिवली ग्रामीण मंडळ अध्यक्ष नंदू परब, महिला अध्यक्षा मनीषा राणे यांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.