डोंबिवली ( शंकर जाधव ) राज्यात एसटीने प्रवास करताना महिलांना तिकीट दरात 50 टक्के सूट दिल्याने महिला वर्ग आनंदी आहे.शनिवारी
भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चा अध्यक्षा चित्रा वाघ यांच्या मार्गदर्शनानुसार कल्याण जिल्हा महिला मोर्चा अध्यक्ष रेखा चौधरी यांच्या सूचनेनुसार डोंबिवली पूर्व मंडळ महिला मोर्चातर्फे डोंबिवली बस स्थानक महिलांनी एसटी सोबत डोंबिवली ते पनवेल असा प्रवास केला.’महिला सन्मान योजना’ महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून राज्यातील महिला प्रवाशांसाठी सवलत जाहीर करण्यात आली आहे. त्याची अंमलबजावणी आजपासून होणार आहे.

राज्यातील महिलांसाठी आनंदाची बातमी आहे.शिंदे- फडणवीस सरकरच्या निर्णयाचे महिलांतर्फे आभार व्यक्त करतो असे भाजप महिला आघाडी डोंबिवली पूर्व मंडळ अध्यक्षा पूनम पाटील यांनी सांगितले.