प्रवास (Travel) आपल्याला खूप काही शिकवून जातो. मग तो आयुष्याचा प्रवास असो किंवा एखाद्या ठिकाणी पर्यटनासाठी जाण्याचा. प्रवासाशिवाय जीवन निरस आहे. माणसाच्या आयुष्याचा (Life) प्रवास म्हणजे त्याच्या आयुष्यात येणारे सुख दुःख अवघड निर्णय तर पर्यटनासाठी जातानाचा प्रवास म्हणजे अवघड रस्ते, वेगवेगळ्या ठिकाणची माणसे इत्यादी. या प्रवासाचे खूप फायदे आहेत. माणसाच्या प्रवासाचे प्रत्येकाचे कारण वेगळे असते. काही लोक रोजच्या जीवनातून विश्रांती मिळावी म्हणून प्रवास करतात तर काही आवड म्हणून करतात. प्रवास जीवनात मनोरंजन आणि नवी शिकवणी (Life lesson) चे दार उघडतात. प्रवासामुळे सामाजिक आणि संवाद कौशल्य सुधारण्यास मदत होते. ज्या प्रकारे आपले आयुष्य संवादाशिवाय (Communication) अपूर्ण असते तसेच संवादाशिवाय प्रवास अपूर्णच. सामाजिक चिंतेचा व सामाजिक परिस्थिती समजून घेण्याची आवड असलेल्या माणसांसाठी हा एक प्रकारचा व्यायाम असू शकतो. प्रवासामुळे मनाला तसेच डोक्याला शांती मिळते. त्यामुळे आपल्याला एक सकारात्मक ऊर्जा मिळते.

लोक म्हणतात जर तुम्हाला पुस्तक वाचण्यात रस नसेल तर ज्ञानासाठी प्रवास करा. कारण त्यातून जे शिकायला मिळत ते कोणत्याही शाळा कॉलेजेस मध्ये शिकता नाही येणार. आपण जिथे जातो तेथील परिसर त्या भागातील लोक त्यांची जगण्याची पद्धत आपल्यापेक्षा वेगळी असू शकते. विविध भाषा,संस्कृती,परंपरा,स्वभाव,समाज यांची ओळख प्रवासातून होते.

हे सर्व झालं निसर्गाच्या प्रवासाबद्दल पण, आयुष्याच्या प्रवासाचे सुद्धा काहीसे असेच आहे. पाहायला गेलं तर दोन्ही प्रवास मिळते जुळतेच आहे. दोन्ही प्रवासातून शिकायला सारखेच मिळते. प्रवासात सुद्धा अपल्याला वेगवेगळ्या स्वभावाची,समाजाची,संस्कृती ची माणसे भेटतात. त्यांच्याकडून सुद्धा आपल्याला शिकवण घेता येते. आपल्या जीवनातील चढउतार हे एका खडतर रस्त्यांसारखेच असतात. कधी सपाट रस्त्यावर आनंद देणारे तर कधी खड्ड्यातून जाताना त्रास देणारे, कधी डोंगरावरून वर चढणारे तर कधी उतरणीचा प्रवास म्हणजे आयुष्यच. चालत चालत कधी तरी ठेच लागू शकते. आयुष्यात भेटणारी माणसे कधी शेवटपर्यंत साथ देणारी तर कधी ट्रेन मधून प्रवास करताना शेजारी बसलेल्या माणसाप्रमाणे त्यांचे स्थानक आले कि उतरणारे असू शकतात. कधी कंटाळवाणे तर कधी मनोरंजक. जीवनाच्या प्रवासाचे असेच असते. माणूस याच खडतर रस्त्याने पुढे जातो व आपल्या गंतव्यठिकाणी पोहोचतो.
थोडक्यात काय तर जीवन हे एखाद्या प्रवासासारखेच आहे. दोन्ही प्रकारच्या प्रवासातून शिकवण सारखी च मिळेल. त्यामुळे प्रवास करत रहा,आणि त्यातून शिकवण घ्यायला विसरू नका.
संजना मोरे