34 C
Mumbai
Tuesday, April 11, 2023
Homeब्लॉगहँगओव्हर पासून वाचण्यासाठी हे सोपे उपाय करा

हँगओव्हर पासून वाचण्यासाठी हे सोपे उपाय करा

आज नव्या वर्षाचं सेलिब्रेशन म्हणून बरेच जण बाहेर फिरण्याचा प्लॅन करत असतील. तर काही जण बाहेर जाऊन पार्टीचा प्लॅन करतील. अर्थात काय तर नव्या  वर्षाचं सेलिब्रेशन म्हंटल की पार्टी आणि पार्टीत ड्रिंक्स होणारच. पण काही जण पार्टीच्या मोहामध्ये इतकं ड्रिंक करतात की, नव्या वर्षातील पहिल्या दिवसांत त्यांना झोप काही आवरत नाही. पार्टीचा हँगओव्हर काही दिवसभरात उतरत नाही. हँगओव्हर (hangover) होत असेल तर हे आहेत काही उपाय. पण पार्टीनंतर येणारा हँगओव्हर अगदी नकोसा वाटतो. Christmas, New Year Party चा आनंद घेऊनही हेल्दी राहण्यासाठी काही खास टिप्स. एकीकडे पार्टीच्या धमाकेदार सेलिब्रेशननंतर मळमळ, उलटी, डोकं जड होणे, डिहायड्रेशन यांसारख्या अनेक समस्या उद्भवतात. पण यावर काही साध्या सोप्या उपायाने तुम्ही हा त्रास दूर करू शकता. हँगओव्हर दूर करणारे काही सोपे घरगुती उपाय आपण जाणून घेऊयात,

 केळी व बटाटे

जास्त प्रमाणात हँगओव्हर होत असेल तर २ ते ३ केळी एकावेळी खावीत. कारण यातील ‘मॅग्नेशियम’ (magnesium) रक्तवाहिन्यांना रिलॅक्स करते. त्यामुळे हँगओव्हरपासून सुटका मिळवण्याकरिता याचा फायदा होतो. बटाटे खाल्याने हँगओव्हरपासून कामी होण्यास मदत होते. कारण ‘पोटॅशिअम’ (Potassium) हँगओव्हर उतरण्यासाठी फायदेशीर ठरते

दही व तेलकट पदार्थ

ज्या पदार्थांमध्ये कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते असे पदार्थ डोकेदुखी कमी करण्यास मदत करतात. दह्यात देखील मोठ्या प्रमाणावर कॅल्शियम असते त्यामुळे हँगओव्हर दूर होण्यात मदत होते. पार्टीनंतर होणारा हँगओव्हर दूर करायचा असेल तर तेलकट पदार्थ खाऊन पार्टीला जा. यामुळे शरीरामध्ये अल्कोहोल शोषले जात नाही.

ब्लॅक कॉफी व पाणी

हँगओव्हरमुळे होणारी डोकेदुखी कमी करण्यासाठी कॉफी प्यावी. मात्र ब्लॅक कॉफी पिणे चांगले. शरीरामधील टॉक्सिफिकेशनसाठी पाणी महत्त्वाचे असते. जास्त अल्कोहोल घेतल्याने शरीरात पाण्याची कमतरता होते. त्यामुळे ड्रिंकसोबत व ड्रिंकनंतर भरपूर पाणी प्या. 

नारळपाणी व आले

हँगओव्हर दूर करण्यासाठी नारळपाणी पिणे हे फायदेशीर ठरते. कारण मिनरल्स पोट साफ करण्याचे काम करत असतात. शरीरातील कमी झालेली पाण्याची पातळी भरुन काढण्याकरिता नारळपाणी फार उत्तम ठरतते. नारळपाण्याच्या सेवनामुळे शरीराला ‘पोटॅशियम व सोडिअम’ (Potassium and sodium) यासारखे घटक मिळतात. मळमळ व पोट खराब होणे, ही हँगओव्हरची अजून काही लक्षणे आहेत. आले यावर अत्यंत गुणकारी ठरते. कपभर आल्याच्या चहात मध घालून प्या. मधात भरपूर प्रमाणात ‘फ्रुक्टोज’ असते. त्यामुळे हँगओव्हर दूर होण्यास मदत होते.  

अंड व पाणी

अल्कोहोलच्या अधिक सेवनामुळे उलटी, मळमळ यासारखे त्रास जाणवू लागतात. पण यावर अंड हा चांगला उपाय आहे, त्यामुळे हँगओव्हर कमी करायचा असल्यास उकडलेले अंडे खाणे चांगले. डिहायड्रेशन (Dehydration) हे हँगओव्हसचे प्रमुख लक्षण आहे. अल्कोहोलच्या अधिक सेवनाने शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. त्याचबरोबर वारंवार लघवीला होते. परिणामी शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे डिहायड्रेशनपासून सुटका मिळविण्याकरिता भरपूर पाणी प्या. त्यामुळे शरीरातील टॉक्झिन्स बाहेर पडण्यास मदत होईल. थोड्या थोड्या वेळाने पाणी पित राहा. लिंबू, साखर व मिठ एकत्रित करुन घेतल्यास हँगओव्हर उतरण्यात मदत होते.

थंड किंवा गरम पाण्याने अंघोळ

थंड व गरम पाण्याने अंघोळ केल्यास ब्लड सर्कुलेशन सुधारण्यास मदत होते आणि  शरीरातून टॉक्झिन्स (Toxins) दूर  होते. त्यामुळे तुम्हाला जास्त फ्रेश वाटेल.

हे उपाय अमलात आणलेत तर हँगओव्हर पासून सुटका होईल, नव्या वर्षाचे सेलिब्रेशन सुधा दमदार होईल आणि वर्षातला पहिला दिवस सुद्धा सुखाचा होईल.

– हेमा निचरे 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

Translate »